जालना, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्यानंतर जालना जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचं निलंबन करण्याची मागणी जोर धरू लागली होती. वाढत विरोध पाहता दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. आता जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.