आंतरराष्ट्रीय पातळीवर विनोदवीर वीर दासने रोवला भारताचा झेंडा

आंतरराष्ट्रीय पातळीवर विनोदवीर वीर दासने रोवला भारताचा झेंडा

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ‘एमी पुरस्कार 2023’ या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यावेळी या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात भारताचा डंका वाजला आहे. विनोदवीर वीर दासने एमी पुरस्कारावर नाव कोरलं आहे. : प्रसिध्द विनोदवीर वीर दासने एमी पुरस्कार २०२३ मध्ये बेस्ट युनिक कॉमेडीची ट्रॉफी जिंकून इतिहास रचला आहे. वीर दासला नेटफ्लिक्सवरील वीर दास लॅंडिग या शोसाठी एमी इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. वीर दास लॅंडिग सोबतच डेरी गर्ल्स सीझन ३ लाही कॉमेडीसाठी एमी इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले आहे. या आधी 2021 मध्ये वीर दासला त्याच्या ‘टू इंडिया कॉमेडी’ शोसाठी एमी इंटरनॅशल अवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version