आमदार झाले गोंधळी

आमदार झाले गोंधळी

बुलढाणा, २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: राज्यभर गोंधळ माजवणाऱ्या अनेक महत्त्वाच्या निर्णयात अग्रेसर असलेले बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार माजी मंत्री संजय कुटे स्वतःच गोंधळी झाले आहे. गोंधळीच झाले नाही तर चक्क आपल्या गळ्यात वाजंत्र टाकून चक्क संबळ वाजवितांना दिसून आले.


आपल्या बालपणीचे मित्र ज्या वेळी संबळ घेऊन आमदार कुटे यांच्या घरी दाखल झाले त्यावेळी त्यांना संबळ वाजविण्याचा मोह आवरता आला नाही.. टाळ, तुणतुणं आणि संबळ हाती घेत भजनाच्या तालात तल्लीन होतांना आपल्याला आमदार कुटे दिसून आले.. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणारे माजी मंत्री डॉ संजय कुटे यांचा एक वेगळ रूप या निमित्य पहावयास मिळाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version