भारताची चांगली सुरुवात, पण…

भारताची चांगली सुरुवात, पण…

अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारताने सोळा षटकांत तीन बाद १०१ धावा केल्या आहेत. आक्रमक सुरुवात करणाऱ्या भारताला फटकेबाजीच्या नादात तीन धक्के बसले आहेत.

शुभमन गिल सात चेंडूत चार धावा करून स्टार्कच्या चेंडूवर झम्पाकडे झेल देऊन परतला
रोहित शर्मा एकतीस चेंडूत सत्तेचाळीस धावा करून मॅक्सवेलच्या चेंडूवर हेडकडे झेल देऊन परतला (३ षटकार, ४ चौकार)
श्रेयस अय्यर तीन चेंडूत चार धावा करून पॅट कमिन्सच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)

क्रिकेट विश्वचषक २०२३
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
भारत वीस षटकांत तीन बाद ११५ धावा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version