चित्रपटगृहात फोडले फटाके

चित्रपटगृहात फोडले फटाके

मालेगाव, १३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मालेगावच्या चित्रपटगृहात एक हिंदी चित्रपट सुरू असताना धक्कादायक घटना घडली. चित्रपटगृहात बसलेल्या काही टवाळखोरांनी फटाके फोडले. चित्रपटगृहात फटाके फोडण्यात आले. या धक्कादायक घटनेमुळे चित्रपटगृहातील प्रेक्षकांची पळापळ झाली. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. याआधी १९९७ मध्ये दिल्लीच्या उपहार सिनेमागृहात आग लागून मोठी जीवितहानी झाली होती. दिल्लीतली आग ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे लागली होती. पण मालेगावच्या सिनेमागृहात टवाळखोरांमुळे आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता. आग लागली असती तर मोठी जीवितहानी झाली असती.

महत्त्वाचे मुद्दे

मालेगाव – चित्रपटगृहात फोडले फटाके
टवाळखोरांची जीवघेणी हुल्लडबाजी
प्रेक्षकांची झाली पळापळ
व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल

उपस्थित झालेले प्रश्न

सिनेमागृहात प्रेक्षकांनी फटाके नेले कसे ?
चौकशी होणार का ?
दोषींवर आणि सिनेमागृह व्यवस्थापनावर कारवाई होणार का ?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version