मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उत्सव फेऱ्या

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उत्सव फेऱ्या

मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतातील पर्यटनस्थळांसह बारा ज्योतिर्लिंग आणि तीर्थस्थळी पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. या पर्यटकांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने एकूण ९१९ उत्सव विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते धुळे विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. गाडी क्रमांक ११०११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते धुळे एक्सप्रेस सोमवारी दुपारी बारा वाजता सुटेल. धुळ्यात रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जामदा, शिरूड येथे थांबा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version