वाडकरांना मंगेशकर पुरस्कार

वाडकरांना मंगेशकर पुरस्कार

मुंबई, ११ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राज्य शासनाचा २०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत पुरस्काराच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली असून राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे. भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार २०२२ पं. उल्हास कशाळकर यांना तर भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार २०२३ पं. शशिकांत (नाना) श्रीधर मुळ्ये यांना जाहीर करण्यात आला. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार २०२२ सुहासिनी देशपांडे यांना जाहीर झाला. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार २०२३ अशोक समेळ यांना जाहीर झाला. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२२ पुरस्कार नयना आपटे यांना जाहीर झाला. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२३ मकरंद कुंडले यांना जाहीर झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version