उद्धव मुंब्र्यात

उद्धव मुंब्र्यात

ठाणे, ११ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अनधिकृत असल्याचे कारण देत प्रशासनाने उद्धव गटाची मुंब्रा येथील एक शाखा पाडून टाकली. या पाडलेल्या शाखेचा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्याचा प्रयत्न उद्धव गटाने सुरू केला आहे. सुप्रिया गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या निमंत्रणावरून उद्धव मुंब्रा येथे आले आहेत. त्यांनी पाडलेली शाखा बघितली आणि मुंब्रा येथे सभा घेतली. या सभेसाठी मविआ समर्थकांची गर्दी होती.

‘अनधिकृत शाखेचं भाडं खाता का ?’

‘आतापर्यंत उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात का यावेसे वाटले नाही, आता ऐन दिवाळीत मुंब्रा येथे येऊन हिंदू – मुस्लिम बांधवामध्ये असलेली शांतता भंग करण्यासाठी येत आहेत का? अनधिकृत शाखेचं भाडं खाता का ?’ असे प्रश्न शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांनी उपस्थित केले. उद्धव मुंब्रा येथे असताना कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

महत्त्वाचे मुद्दे

वादग्रस्त ठिकाणी जाण्यापासून उद्धव यांना पोलिसांनी रोखले
उद्धव यांना शिवसैनिकांनी दाखवले काळे झेंडे

……….

मला शाखेपर्यंत जाऊ द्या – उद्धव
पोलिसांनी अडवल्यावर उद्धव गाडीत बसले

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version