सिकंदर शेख ६६ वा महाराष्ट्र केसरी

सिकंदर शेख ६६ वा महाराष्ट्र केसरी

पुणे, १० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सिंकदर शेख ६६ वा महाराष्ट्र केसरी झाला. मागच्या वर्षीचा उपविजेता सिंकदर शेख यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता झाला. पहेलवान सिकंदरने पहेलवान शिवराज राक्षेचा पराभव केला. सिकंदर २०२३ – २४ च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता झाला. मानाची चांदीची गदा देऊन सिकंदरचा गौरव करण्यात आला.

यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे झाली. स्पर्धेची अंतिम लढत सिंकदर शेख आणि शिवराज राक्षे यांच्यात झाली. या लढतीत सिकंदरने मैदान मारले. यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत राज्यातील ३६ जिल्हे आणि सहा महापालिका असे ४२ संघ भिडले. एका कुस्ती संघात गादी विभागातील दहा आणि माती विभागातील दहा असे वीस कुस्तीगीर आणि दोन मार्गदर्शक आणि एक संघ व्यवस्थापक असे २३ जण होते. यंदाच्या स्पर्धेत ८४० कुस्तीगीर आणि ८४ कुस्ती मार्गदर्शक यांच्यासह ४२ व्यवस्थापक, ८० पंच, ५० पदाधिकारी अशा ११०० जणांचा सहभाग होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version