साई वर्ल्ड सिटी इमारतीच्या अठराव्या मजल्याला आग

साई वर्ल्ड सिटी इमारतीच्या अठराव्या मजल्याला आग

पनवेल, १० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पनवेल जवळील पळस्पे फाटा येथे साई वर्ल्ड सिटी इमारत संकुलातील एका इमारतीच्या अठराव्या मजल्याला आग लागली. आग लागल्यामुळे एका घराचे नुकसान झाले. घरातील निवासी बाहेर असताना आग लागली. आग लागल्याचे बघून परिसरातील नागरिकांनी तातडीने पनवेल अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून कारवाई केली. यामुळे आग लवकर नियंत्रणात आली.
या प्रकरणी चौकशी सुरू आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version