पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी माळेगावच्या रणजीत तावरेंची वर्णी

पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी माळेगावच्या रणजीत तावरेंची वर्णी

पुणे, ०८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर संचालक काेण होणार, या चर्चवर आता पडदा पडला आहे. अजितदादांचे निकटवर्तीय रणजीत अशोकराव तावरे (रा. माळेगाव, ता. बारामती) यांची संचालकपदी वर्णी लागली आहे. त्यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. संचालकपदी रणजीत तावरे यांची सर्वानुमते निवड झाल्याने माळेगावात युवकांनी एकच जल्लोष केला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागेल, याकडे सगळ्यांचे लक्ष होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version