मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील कोहिनूर स्क्वेअर इमारतीत असलेल्या मुंबई महापालिकेच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. या आगीत तब्बल २० गाड्या जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाने घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही.
मुंबईतील शिवाजी पार्क येथे कोहिनूर स्क्वेअर इमारत आहे. ही इमारत वर्दळीच्या ठिकाणी आहे. या इमारतीच्या समोरच शिवसेना भवन आहे. येथे मुंबई महानगर पालिकेच्या पार्किंग असून या ठिकाणी रात्री अचानक आग लागली. ही आग होती की काही अवधीतच येथील २० ते २२ गाड्या या आगीत भस्मसात झाल्या. ही आग चौथ्या मजल्यावर लागली. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. या आगीवर तातडीने पाण्याचा मारा करून ही आग विझवण्यात आली आहे. सध्या कूलिंगचं काम सुरु आहे. दरम्यान, या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
या पार्किंगमध्ये कंत्राटदाराकडून नियमबाह्य पद्धतीने गाड्या पार्क केल्या जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून त्यामुळेच ही आग लागल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.