आता ‘गौतम गंभीर’ वर ही येणार बायोपिक?

आता ‘गौतम गंभीर’ वर ही येणार बायोपिक?

सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत बरीच दिग्गज व्यक्तींच्या जीवनावर चित्रपट बनवले जात आहेत. यात काही दिग्गज खेळाडूंचा देखील समावेश आहे. अलीकडेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी यांच्या आयुष्यावर बायोपिक प्रदर्शित झाले होते. त्यानंतर आता
प्रसिद्ध क्रिकेटपटू गौतम गंभीर याच्या जीवनावर देखील चित्रपट येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही तरी अभिनेता विकी कौशल याने गौतम गंभीर याच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा दर्शवली आहे.

नुकतेच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक सामन्या दरम्यान प्रसिद्ध क्रिकेटपटू गौतम गंभीर, आकाश चोप्रा हे सामन्याचे समालोचन करताना त्यांच्यात गौतमच्या बायोपिकविषयी चर्चा रंगली. यावेळी अभिनेता विकी कौशल देखील तेथे उपस्थित होता. यावेळी बोलताना गौतमनं देखील त्याच्या प्रस्तावाला होकार दिल्याचे कळते आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version