संभाजीनगर शहरावर नवे संकट, जायकवाडीत पंपाची क्षमता घटली

संभाजीनगर शहरावर नवे संकट, जायकवाडीत पंपाची क्षमता घटली

छत्रपती संभाजीनगर,प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी पुरवठ्यावरील संकट कायम आहे. अशातच आता जायकवाडी येथील पाणी उपसा करणाऱ्या पंपांची क्षमता घटली घटल्याने ऐन दिवाळी सणात पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दररोज सुमारे सात एमएलडी पाण्याचा तुटवडा येत आहे.
एकीकडे क्षमता कमी झालेले पंप तपासून ते बदलण्याचे काम सुरू असले तरी हे किती दिवसात पूर्ण होईल, याची शाश्वती नसल्याने दिवाळीत देखील सात-आठ दिवसानंतरच नळाला पाणी मिळणार आहे.तर दुसरीकडे दिवसेंदिवस शहराचा पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. काही वेळा तांत्रिक कारणांमुळे तर काही वेळा पाइपलाइन फुटल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत. तर आता जायकवाडी पंपाची क्षमता घटल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version