वसई-विरारमधील रस्त्यांच्या कामांसाठी ६०० कोटी

वसई-विरारमधील रस्त्यांच्या कामांसाठी ६०० कोटी

वसई, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : वसई-विरारमधील रस्त्यांच्या कामांसाठी ६०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रस्तावांना मंजुरी दिली. हे प्रस्ताव गडकरींपुढे बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मांडले होते. वसई जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी गडकरी आले होते. याप्रसंगी रस्त्यांचा विषय हितेंद्र ठाकूर यांनी गडकरींपुढे मांडला. रस्त्यांच्या कामांना एका महिन्याच्या आत सुरुवात करण्याचा निर्णय झाला.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर ते तलासरी दरम्यान बारा मार्गिकांचा काँक्रिट रस्ता, महापालिका हद्दीत ४० मीटरचा रिंगरस्ता, महामार्गापासून पाच शहरांमध्ये येणाऱ्या रस्त्याचं काँक्रिटीकरण आदी प्रकल्पांचा रस्त्यांच्या कामांमध्ये समावेश आहे. लवकरच आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर गडकरींची दिल्लीत जाऊन भेट घेणार आहेत. या भेटीत वसई-विरारमधील इतर विकास योजनांवर चर्चा होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version