उपोषणाला बसलेल्या तरुणांची प्रकृती खालवली

उपोषणाला बसलेल्या तरुणांची प्रकृती खालवली

मुंबई, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्यात सर्वत्र मराठा आरखनाचाही आणीबाणी सुरु असून सर्वत्रच उपोषण आणि आंदोलने करण्यात येत आहेत. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील आमरण उपोषणाला बसलेल्या तरुणांची प्रकृती खालवली आहे. या तरुणांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

आमरण उपोषणांमध्ये गोरख दळवी, संतोष आजबे, नवनाथ काळे, अमोल हुंबे हे चार मराठा कार्यकर्त्यांनी अन्न व जल त्याग केला आहे. दोन दिवसांपूर्वी या उपोषणकर्त्यांना तपासण्यासाठी शासकीय आरोग्य पथक उपोषण स्थळी आले होते. मात्र उपोषणकर्त्यांनी उपचार नाकारल्याने हे पथक निघून गेले. मात्र आता चौथ्या दिवशी या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवली असून त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्याने आणि रक्तदाब वाढल्याने अखेर मराठा समाजातील काही डॉक्टरांनी या चार तरुणांवर उपचार सुरू केले आहेत. या उपोषणकर्त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून सध्या तात्पुरते या चार उपोषणकर्त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. पुढील दोन दिवस जर हे आमरण उपोषण सुरू राहिले तर या उपोषणकर्त्यांची परिस्थिती गंभीर होऊ शकते. असेही उपचार करणाऱ्या डॉ.अविनाश मोरे, डॉ.सचिन पांडुळे, डॉ.सुनील बोठे डॉक्टरांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version