पार्थ पवार होणार संचालक ?

पार्थ पवार होणार संचालक ?

पुणे, २७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी पार्थ पवार यांची निवड होण्याची शक्यता आहे. पार्थ पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदासाठी बुधवार ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. अजित पवार यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीद्वारे पार्थ यांची निवड संचालक मंडळावर होण्याची शक्यता आहे. याआधी पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघातून २०१९ ची लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पार्थ यांचा पराभव झाला होता. पराभवामुळे पार्थ यांचे राजकीय पदार्पण लांबणीवर पडले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version