शिर्डी, २६ ऑक्टोबर २०२३ प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र योजना सुरू केली आहे. यामुळे वर्षभरात केंद्राचे सहा हजार रुपये आणि आणि महाराष्ट्र शासनाचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहेत. हा लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी २०२३ – २४ करिता ६९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांना १७१२ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पहिल्या हप्त्याच्या वितरणाचे काम सुरू झाले आहे. हा शुभारंभ शिर्डीत झाला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.