कराड, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : कराड शहरातील मुजावर कॉलनीतील शांतीनगर येथे स्फोट होऊन सहा घरांचे नुकसान झाले. स्फोटात सहा जण जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण समजलेले नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. स्फोटाची तीव्रता एवढी प्रचंड होती की, घराची भिंत कोसळली. शेजारच्या घराचेही नुकसान झाले. अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना दलाल यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.