कांदिवलीत इमारतीला आग

कांदिवलीत इमारतीला आग

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : कांदिवलीतील महावीर नगर परिसरातल्या वीणा संतूर नावाच्या इमारतीला आग लागली. या दुर्घटनेत एक महिला आणि एक मुलगा अशा दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन महिला जखमी झाल्या. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास इमारतीला आग लागली. तातडीने अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. अग्निशमन दलाने प्रयत्नांची शर्थ केली आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

मृत

१. ग्लोरी वालफाटी (४३)
२. जोसू जेम्स रॉबर्ट

जखमी

१. रंजन सुबोध शहा (७६) – ४५ ते ५० टक्के भाजली
२. लक्ष्मी बुरा (४०) – ४५ ते ५० टक्के भाजली
३. राजेश्वरी भरतरे (२४) – १०० टक्के भाजली

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version