मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मराठ्यांसाठीची आर्थिक आरक्षणाची जाहिरात मागे घ्या अशी मागणी मराठा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली. या मागणीवर अद्याप राज्य शासनाचा निर्णय जाहीर झालेला नाही.
राज्य शासनाने मराठ्यांसाठीची आर्थिक आरक्षणाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार पात्र व्यक्तींना आरक्षणांतर्गत सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. पण मराठा समाजाला आर्थिक निकषांवर नाही तर समाज म्हणून आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठ्यांकडून सातत्याने येत आहे. याच कारणामुळे मराठ्यांसाठीची आर्थिक आरक्षणाची जाहिरात मागे घ्या अशी मागणी मराठा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.