नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ४६ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. महागाई भत्त्यातील वाढीचा लाभ ४७ लाख कर्मचाऱ्यांना आणि ६८ लाख निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. वाढीव महागाई भत्ता १ जुलै २०२३ पासून लागू होणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जुलै ते ऑक्टोबर या कालावधीतील थकबाकीसह नोव्हेंबर महिन्यापासून वाढीव पगार मिळेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.