मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: मुंबई – आग्रा महामार्गावर नरडाणा येथे खासगी बसला अपघात झाला आहे. सकाळी ९ च्या सुमारास हा अपघात झाला आहे. या खासगी बसमध्ये ७० पेक्षा अधिक प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ही ट्रॅव्हल्स पुण्याहून उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे जात होती. अपघात झाल्यानंतर नरडाणा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले होते. जखमींना धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. तोल गेल्यामुळे ट्रॅव्हल्स पलटी झाली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.