कुणबी नोंदी तपासणीसाठी समिती मराठवाड्यात

कुणबी नोंदी तपासणीसाठी समिती मराठवाड्यात

छत्रपती संभाजीनगर, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष आणि निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे व समिती सदस्य छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. आतापर्यंत पाचशे नोंदी हाती लागल्या आहेत. नागरिकांकडे असलेल्या पुराव्यांची पडताळणी करून ते गोळा करण्यात आले आहेत. १३ विभागातील अभिलेखांची तपासणी बारकाईने करण्यात आली आहे. समितीने आतापर्यंत बावीस लाख पुरावे तपासले आहेत. जिल्ह्यात ५०० पुरावे आहेत.त्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात आज १५ पुरावे आले आहेत.

बेगमपुरा येथे मराठा पंच कमिटी आहे. ही कमिटी ग्राम पंचायतीप्रमाणे आहे.या कमिटीत अध्यक्ष नाना पवार, किशोर शिंदे, प्रकाश पटारे, ज्ञानेश्वर जगताप, सुभाष डोंगरे, राजु कोकणे, सचिन सरकटे यांचा समावेश आहे. पंच कमिटीने दिलेल्या माहितीनुसार या पंचायतीकडे २५० वर्ष जुनी ही पितळी भांडे आहेत. ज्यात पाण्याची टाक, डेग अशी एकूण पाच भांडी आहेत. या भांड्यांवर उर्दू भाषेत, मोडी भाषेमध्ये, मराठी भाषेत मजकूर लिहिले आहे. ज्यात ‘कुणबी बेगमपुरा’ असा मजकूर लिहिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version