सीबीडी बेलापूर, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : नवरात्रोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रो सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. अद्याप नवी मुंबई मेट्रो सेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. पण रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली अलिकडेच नवी मुंबई मेट्रो संदर्भात एक बैठक झाली. या बैठकीनंतरच नवी मुंबई मेट्रो सेवेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
नवी मुंबई मेट्रो सेवेचा पहिला टप्पा तयार
बेलापूर ते पेंढर : ११ किमी. चा पहिला टप्पा
दुसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरू
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.