छत्रपती संभाजीनगर, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ब्राह्मण संघटनांच्या वतीने विविध मागण्यासाठी मंगळवारी छत्रपती संभाजीनगरातील वंदे मातरम सभागृहापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण समाज आणि ब्राह्मण संघटना एकत्रित आल्या. ब्राह्मणांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, समाजातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण मोफत करावे; या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.