मुंबईहून पुण्याला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी

मुंबईहून पुण्याला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी

मुंबई, ०९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर दुपारी १२ ते २ असा हा दोन तासांचा हा ब्लॉक असणार आहे. अमृतांजन पुलाच्या अलिकडे अन पलिकडे म्हणजे किलोमीटर ४५ आणि ४५.८०० किलोमीटरवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार असल्याने हा ब्लॉक घेतला जाणार आहे.

पुण्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक खालापूर टोल नाक्यावर थांबवण्यात येणार आहे. हलकी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळविण्यात येणार आहे. कारची वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील शिंग्रोबा घाटामार्गे सुरू राहणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version