बुलढाण्यात डेंग्यूचा २ रुग्णांचा मृत्यू

बुलढाण्यात डेंग्यूचा २ रुग्णांचा मृत्यू

बुलढाणा, ९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यात डेंग्यू आजाराने थैमान घातले असून देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली बुजुर्ग येथील दोन लहान मुलांचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ माजली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली, निमखेड गट ग्रामपंचायत, भिवगाव मेहुनाराजा, उंबरखेड या गावात मोठ्या प्रमाणात डेंगू सदृश्य आजाराने शिरकाव केला आहे.

आरोग्य यंत्रणेने रॅपिड टेस्ट केल्यानंतर बरेचसे जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे देऊळगाव राज्यात डेंग्यू सदृश्य तापाने थैमान घातले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देऊळगावराजा, सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक रुग्ण जालना जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version