नाशिकमध्ये सापडले कोट्यवधींचे अंमली पदार्थ

नाशिकमध्ये सापडले कोट्यवधींचे अंमली पदार्थ

नाशिक, ८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: नाशिक शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये मोठा ड्रग्ज साठा सापडला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ३०० कोटीहून अधिक रकमेचा हा साठा असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान एमडी ड्रग्स आणि ड्रग्स बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल पोलिसांनी जप्त केला. नाशिकमधील शिंदे एमआयडीसीमध्ये परिसरात हा साठा मोठा सापडला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी शिंदे एमआयडीसी परिसरामध्ये मोठी कारवाई केली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांकडून पुन्हा एकदा त्याच भागामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहर ड्रग्जच्या विळख्यात तर सापडलं नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय. त्यामुळे नाशिकमध्ये सुरु असलेल्या या ड्रग्ज प्रकरणाचा पोलिसांकडून देखील तपास सुरु आहे. या तपासात आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version