संजय राऊतांविरोधात मानहानीचा दावा

संजय राऊतांविरोधात मानहानीचा दावा

मालेगाव, ०८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: मंत्री दादा भुसे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या विरुद्ध मालेगावच्या जिल्हा आणि अप्पर सत्र न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असून न्यायालयाने कलम ५०० अन्वये खटला दाखल करून संजय राऊत यांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाने २३ ऑक्टोबर रोजी संजय राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गिरणा साखर कारखान्यात १७८ कोटीचा शेयर घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या आरोपाच्या विरुद्ध भुसे यांनी कोर्टात धाव घेऊन दावा दाखल केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version