धनंजय मुंडेंच्या कार्यक्रमात गोंधळ

धनंजय मुंडेंच्या कार्यक्रमात गोंधळ

पंढरपूर, ६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे राज्यस्तरीय कृषी मेळाव्यासाठी पंढरपूर येथे आले होते. पंढरपूरच्या मुंडेंच्या कार्यक्रमात खते बी बियाणे दुकानदारांनी गोंधळ घातला. बोगस बी बियाणे संदर्भात दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याच्या कायद्याविरोधात दुकानदार आक्रमक झाले.

आम्हाला मिळणारी खते अथवा बियाणे हे कंपन्या बनवतात. ते योग्य का अयोग्य याची तपासणी राज्याचे कृषी अधिकारी करतात. यानंतर पॅकिंग केलेले साहित्य राज्यभर विक्रीसाठी दुकानात येत असताना बोगस बियाणे अथवा खते आढळल्यास कारवाई आमच्यावर का? असा प्रश्न दुकानदारांनी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version