बस चालकाला हृदय विकाराचा झटका

बस चालकाला हृदय विकाराचा झटका

हिंगोली, ६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: हृदय विकाराचा झटका येऊन परिवहन विभागाच्या बस चालकाचा बस स्टॅन्ड मध्ये मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. हिंगोली आगारामध्ये चालक पदावर कार्यरत असणारे सुरेश सलामे रात्री उशिरा बस फेरी पूर्ण करून हिंगोली बस स्थानकात दाखल झाले. त्यानंतर उशीर झाल्याने आराम करण्यासाठी बस स्थानकात असलेल्या विश्रांतीगृहात गेले आणि तिथेच सकाळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचं समजलं आहे. बस स्थानक प्रशासनाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. मयत सुरेश सलामे यांना आता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version