सिद्धेश्वर धरण ९८ टक्के भरले

सिद्धेश्वर धरण ९८ टक्के भरले

हिंगोलीतल्या औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदीवरील सिद्धेश्वर धरण हे ९८ टक्के क्षमतेने भरले आहे. या धरणातून पूर्णा पाटबंधारेच्या एका कालव्यातून पाणी शेतीला दिलं जातं यामध्ये औंढा नागनाथ वसमत तालुका त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील अनेक गावातील शेतीला या पाण्याचा फायदा होतोय. विशेष म्हणजे याच पाण्याच्या भरोशावर शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये उसाच्या पिकाची लागवड होत असते. यावर्षी हे धरण ९८ टक्के भरल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कारखानदार यांच्यातही आनंदाचे वातावरण आहे. हिंगोली आणि वसमत शहराला याच धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरल जाते त्यामुळे आत्ता पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version