ड्रग्स माफिया ललित पाटील फरार

ड्रग्स माफिया ललित पाटील फरार

पुणे, ३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: ससून रुग्णालयातील आरोपी ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ललित पाटील हा अंमली पदार्थांची तस्करी करणारा गुन्हेगार आहे. ३० सप्टेंबरला पुणे पोलिसांनी तब्बल २ कोटी १५ लाखाचे ड्रग्स जप्त केले होते. ललित पाटीलचे ड्रग्स रॅकेट पुण्यात आणखी मोठे असल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र तो पळून गेल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी शिक्षा भोगत असताना त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयातील वॉर्ड १६ मध्ये दाखल केले होते. या घटनेनंतर ललित पाटील याने एक्स-रे काढण्याच्या बहाण्याने पोलिसांना चकवा देऊन त्याने पलायन केले. पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version