वर्धा, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्यावतीने ओबीसी जागर यात्रा काढण्यात आली. सेवाग्राम येथून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आशिष देशमुख आदींच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा 44 विधानसभा मतदारसंघातून दोन हजार किलोमीटरवर प्रवास करणार आहे. वाशिम जिल्ह्याच्या पोहरादेवी येथे 12 ऑक्टोबर रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे. यादरम्यान राज्य तसेच केंद्र शासनाच्यावतीने ओबीसीकरीता राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती ओबीसी पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.