मुंबई, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असे सेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. मागच्या वर्षी उद्धव गटाला झुकते माप दिले होते.
अगोदरची मागणी पण आमचीच आहे… हिंदुत्व पण आमच्याकडे आहे आणि विचार ही आमच्याकडे आहे… आमचा हक्क आम्ही सोडणार नाही… असे आमदार संजय गायकवाड म्हणाले. आम्हाला परवानगी मिळायलाच पाहिजे, नैसर्गिक रित्या मिळाली पाहिजे. बाळासाहेबांचे विचार पण आमच्याकडेच आहेत, असेही आमदार संजय गायकवाड म्हणाले.
मागच्या चाळीस वर्षापासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होत आहे… आता ते काँग्रेस सोबत गेले , त्यांचा काहीही संबंध राहिला नाही… त्यांनी काँग्रेस सोबत दुसरे मैदान शोधायला पाहिजे… मागील वर्षी आम्ही वांद्रे कुर्ला येथे मेळावा घेतला, आम्हाला त्यांना दुखवायचे नव्हते, त्यामुळे आम्ही दोन पावलं मागे आलो…. पण आता ते पूर्णपणे काँग्रेसवासी झाले आहेत… आता माघार घ्यायची गरज नाही… यावेळी आम्ही आमचा हक्क सोडणार नाही, आमदार संजय गायकवाड म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.