सामंतांच्या बंधूचे भुवया उंचावणारे व्हाट्सअॅप स्टेटस

सामंतांच्या बंधूचे भुवया उंचावणारे व्हाट्सअॅप स्टेटस

कोकणातील मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनी आपल्या डीपीला ठाकरे गटाची निशाण असणारे मशाल हे चिन्ह ठेवले होते. मात्र, याची चर्चा सुरु होताच त्यांनी मशालीच्या चिन्हाचा डीपी बदलला. पण या प्रकारावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे चिन्ह हे मशाल आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांचे नाव शिवसेनेकडून घेतले जात आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपाचे युवा नेते कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी या मतदारसंघात भाजपाच निवडणूक लढवेल, असे ठणकावून सांगितले होते. किरण सामंत यांना हवे असेल तर त्यांनी भाजपामध्ये यावे. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीचा वरिष्ठ विचार करतील, असे नितेश राणे यांनी म्हटले होते.

होय मी मशालीचं स्टेटस ठेवलं होतं. पण उद्योगमंत्री उदय सामंत यांचे राजकीय करिअर बाद होऊ नये म्हणून हे स्टेटस मागे घेतले आहे, असेही किरण सामंत यांनी स्पष्ट केले. मी लवकरच स्पष्ट बोलणार आहे. बेलगाम बोलताय त्यांच्यासाठी हे स्टेटस होते, असा टोला किरण सामंत यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून मी स्टेटस मागे घेतले आहे. योग्यवेळी या स्टेटसचे उत्तर देईन, असे किरण सामंत यांनी म्हटले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version