शिर्डीत भक्तांच्या देणगीवर डल्ला

शिर्डीत भक्तांच्या देणगीवर डल्ला

नाशिक, २६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: असंख्य भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्याकरिता,हजारो भक्त शिर्डीला येतात. भक्तीपोटी साईबाबा संस्थानच्या देणगी काऊंटरवर पावती फाडून देणगी देतात. परंतु संस्थानच्या देणगी काऊंटरवरच, हातचलाखी करुन बनावट पावती देत भक्तांच्या पैशावर डल्ला मारला जात असल्साची निनावी तक्रार साई संस्थान कडे आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

देणगी काऊंटरवर बनावट पावत्या देऊन भक्तांच्या पैशावर डल्ला मारणा-यां विरोधात चौकशी सुरू असून सदर तक्रारीची गांभीर्याने दखल घेत. शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. दोषीं विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version