चंद्रपूर, २३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : ओबीसी आरक्षणासाठी बारा दिवसांपासून उपोषण करत असलेल्या रवींद्र टोंगे यांची तब्येत बिघडली. तब्येत बिघडल्यामुळे टोंगे यांना चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. टोंगे रुग्णालयात असले तरी आंदोलन सुरू राहील आणि आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा टोंगेंच्या समर्थकांनी दिला आहे. शनिवारी चंद्रपुरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. नेत्यांच्या घरांवर तिरडी मोर्चा, चंद्रपूर बंद आणि प्रत्येक तालुक्यात लाक्षणिक संप अशा स्वरुपात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा टोंगेंच्या समर्थकांनी दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.