पंतप्रधान मोदी नऊ वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवणार

पंतप्रधान मोदी नऊ वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवणार

नवी दिल्ली, २२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार २४ सप्टेंबर २०२३ रोजी दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नऊ वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही पहिली वेळ आहे जेव्हा एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू होणार आहेत. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सध्याची सर्वात वेगवान लांब पल्ल्याची गाडी आहे. सध्या भारतात २५ वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. रविवारी यात आणखी नऊ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची भर पडणार आहे.

१. उदयपूर – जयपूर वंदे भारत एक्सप्रेस
२. तिरुनेलवेली – मदुराई – चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस
३. हैदराबाद – बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस
४. विजयवाडा – चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस
५. पाटणा – हावडा वंदे भारत एक्सप्रेस
६. कासरगोड – तिरुअनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस
७. पुरी – भुवनेश्वर – राउरकेला वंदे भारत एक्सप्रेस
८. रांची – हावडा वंदे भारत एक्सप्रेस
९. जामनगर – अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version