मुंबई, २१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी साखळी उपोषण सुरू राहणार आहे. या आरक्षणात सहभागी होत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. राज्य शासनाने मराठा आरक्षणासह सर्व मागण्या चाळीस दिवसांत पूर्ण कराव्या नाहीतर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
आधी आमरण उपोषण नंतर साखळी उपोषण
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सोडले. यानंतर वैद्यकीय उपचारांसाठी मनोज जरांगे पाटील काही दिवसांकरिता रुग्णालयात दाखल झाले होते. उपचारांनंतर प्रकृती बरी होताच मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. त्यांनी आता सहकारी आंदोलकांसोबत साखळी उपोषण सुरू केले आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात हे आंदोलन सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.