भारत – कॅनडा संबंधात वितुष्ट

भारत – कॅनडा संबंधात वितुष्ट

नवी दिल्ली, २० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध ताणले आहेत. तणाव वाढला आहे. कॅनडा सरकारने पुरावा न दाखवता भारत सरकारवर हत्येचा आरोप केला. यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

जग दहशतवादाविरोधात लढत आहे. पण कॅनडा सरकारला खलिस्तानी दहशतवाद्यांच्या जीवाची काळजी आहे. कॅनडात हरदीप सिंग निज्जरची हत्या झाली. ही हत्या जून २०२३ मध्ये झाली. पण या प्रकरणात भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने सप्टेंबर २०२३ मध्ये केला. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हा आरोप केला. यानंतर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही अशाच स्वरुपाचा आरोप केला. कॅनडाच्या व्यापार मंत्र्यांनी ऑक्टोबर २०२३ मधील भारताचा नियोजीत दौरा रद्द केला. कॅनडा आणि भारत यांच्यातील मुक्त व्यापार कराराची चर्चा थांबवण्यात आली. भारत सरकारने कॅनडाच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले.

भारतात लोकशाही आहे. एक जबाबदार लोकशाही व्यवस्थेत काम करणारा आणि मानव कल्याणाचा विचार करणारा देश दुसऱ्या देशात जाऊन हत्या करण्यासारखे बेजबाबदार वर्तन करत नाही. कॅनडाचे आरोप हे तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत; अशा स्वरुपाचे उत्तर भारताकडून देण्यात आले.

कॅनडा सरकारने भारताच्या दूतावासातील एका उच्चाधिकाऱ्याला देश सोडण्यास सांगितले. यानंतर भारताने कॅनडाच्या दूतावासातील एका उच्चाधिकाऱ्याला पाच दिवसांत देश सोडण्यास सांगितले. कॅनडाने भारतात जाणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी खबरदारीचा इशारा प्रसिद्ध केला. यानंतर केंद्र सरकारने भारतीयांसाठी आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी खबरदारीचा इशारा प्रसिद्ध केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version