शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टोमॅटो

शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टोमॅटो

येवला, २० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वी देशात टोमॅटो चढ्या दराने विकले जात होते. आता टोमॅटो मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे. टोमॅटोच्या दरात वेगाने घसरण झाली आहे. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिले. ही घटना येवल्यातील मुखेडमध्ये घडली. शेतकऱ्यांनी टोमॅटो नाल्यात फेकून दिले.

नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापारी नाफेडवर नाराज

नाफेड शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा महाराष्ट्रात काही ठिकाणी विकत आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील व्यापारी नाराज झाले आहेत. व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव बेदमुदत बंद केले आहेत. कांद्याचे लिलाव बंद असले तरी टोमॅटोचे तसेच इतर भाज्यांसाठीचे लिलाव सुरू आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version