बुलढाणा, १९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: राज्यातील शासकीय शाळेत कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या विरोधात आता विविध संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शासन निर्णयाची होळी केली आहे. राज्य शासनाने शासकीय शाळेत कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. त्याचबरोबर शासकीय शाळा कॉर्पोरेटरच्या हाती देण्यात येऊ नये, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात आली आहे. सरकारने तात्काळ हा निर्णय मागे न घेतल्यास सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडी कडून देण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.