कर्नाटकातील ‘या’ मंदिरांना मिळाला जागतिक वारशाचा दर्जा

कर्नाटकातील ‘या’ मंदिरांना मिळाला जागतिक वारशाचा दर्जा

म्हैसूर, १८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : कर्नाटकमधील होयसळ राजवंशाने बांधलेल्या मंदिरांच्या समुहाला युनेस्कोने जागतिक वारसा हा दर्जा दिला. युनेस्कोने त्यांचा निर्णय ट्वीट करून जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयावर ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. भारतासाठी आणखी एक अभिमानाची बाब, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले.

होयसळ राजवंशाने बांधलेल्या मंदिरांना होयसळ मंदिरे या नावाने ओळखतात. ही मंदिरे प्राचीन शिल्पकलेने समृद्ध आहेत. मंदिरातील प्रत्येक शिल्पामागे एक ठोस विचार दिसून येतो. अनेक शिल्पांमधून महाभारतातील प्रसंग साकारण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version