जाणून घ्या निज श्रावण अमावस्येचे महत्त्व

जाणून घ्या निज श्रावण अमावस्येचे महत्त्व

पुणे, १४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार यंदा निज श्रावण अमावस्या गुरुवार १४ सप्टेंबर आणि शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी आहे. निज श्रावण अमावस्या या तिथीची समाप्ती शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी होणार आहे. या अमावस्येला जवळच्या पवित्र नदीत स्नान करणे, पितरांचे श्राद्ध करणे यामुळे पुण्य लाभते तसेच पितरांना मुक्ती मिळते असे सांगतात.

निज श्रावण अमावस्येला बैलपोळा हा सण साजरा केला जातो. हाच सण पोळा या नावानेही ओळखला जातो. बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलांना शेतीसाठी जुंपत नाहीत. बैलांना सजवले जाते, ओवाळले जाते. घरी गुळ वापरून तयार केलेले गोड पदार्थ बैलांना खाऊ घातले जातात. घरी बैल नसतील तर मातीचे बैल तयार करून त्यांना ओवाळतात आणि त्यांच्यासमोर घरी गुळ वापरून तयार केलेले गोड पदार्थ ठेवतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version