नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात जुंपली

नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात जुंपली

अमरावती, १३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: काँग्रेस आमदार यशोमती ठाकुर आणि राणा दाम्पत्य यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा भडकण्याची चिन्हं आहेत. राणा दाम्पत्यांनी केलेल्या आरोपांवर आता यशोमती ठाकुर यांनी उत्तर दिलं आहे. गेल्या निवडणुकीत पैसे घेतले असल्याचं सिद्ध करा, मी राजकारण सोडून देते असं आव्हान यशोमती ठाकुर यांनी राणा दाम्पत्याला दिलं. माझ्या बापावर बोलला तर तुम्हाला खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे.

तिवसा या ठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी थेट यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. २०१९ च्या लोकसभेत ताईंनी आमदार रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्या आणि प्रचार दुसऱ्याचा केला. सगळी मतं ही विरोधकांना दिली, तुम्ही काय इमानदारीची भाषा करताय? अशी जहरी टीका खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकुर यांच्यावर केली.

नवनीत राणा यांनी केलेल्या या आरोपांना यशोमती ठाकुर यांनी उत्तर दिलं आहे. यशोमती ठाकुर यांनी राणा दाम्पत्याला ते सिद्ध करुन दाखवण्याचं आव्हान दिलं. त्या म्हणाल्या की, “औकातीत राहायचं. माझ्या बापाने आणि आम्ही जमिनी देण्याचं काम केलं आहे, घेण्याचं नाही. निवडणुकीवेळी मी पैसे घेतल्याचं सिद्ध करा नाहीतर तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. आजगी एखादी निवडणूक आली तर आम्हाला एखादं वावर विकावं लागतंय.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version