भारत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत

भारत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत

कोलंबो, १३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : आशिया चषकाच्या ‘अंतिम चार’ फेरीतले दोन सामने जिंकून भारताने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. भारताने ‘अंतिम चार’ फेरीतला पाकिस्तान विरुद्धचा सामना २२८ धावांनी तर श्रीलंकेविरुद्धचा सामना ४१ धावांनी जिंकला. या विजयांमुळे चार गुण मिळवत भारताने आरामात अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताचा ‘अंतिम चार’ फेरीतला शेवटचा सामना शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ रोजी आहे. श्रीलंकेतील कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही वाहिन्यांवर आणि डिस्ने प्लस हॉटस्टार या अॅपवर होणार आहे.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा २०२३
अंतिम चार फेरी
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत : ४९.१ षटकांत सर्वबाद २१३ धावा
श्रीलंका : ४१.३ षटकांत सर्वबाद १७२ धावा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version