उरणच्या ओएनजीसी प्रकल्पातून तेलाची गळती

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पातून तेलाची गळती

उरण : उरणच्या ओएनजीसी प्रकल्पामधून कच्च्या तेलाची गळती झाल्याची घटना समोर आली आहे. मांगीन देवी मंदिराला लागून असणाऱ्या नाल्यातून ही गळती झाली. या तेलाचा तवंग येथील नाल्यासह समुद्राच्या पाण्यावर पसरला आहे. या गळतीमुळे प्रचंड प्रमाणात तेलाचा वास येथील परिसरामध्ये पसरला होता. तेल गळती झाल्याचे लक्षात येताच ओएनजीसी प्रकल्पाकडून नाल्यातून समुद्रामध्ये मिसाळणारे तेल थांबावण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. तर समुद्र किनाऱ्यावर आलेला तेलाचा जाड थर जमा करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह सक्शन पंप, ड्रम, सक्शन वॅन घटनास्थळी कार्यरत झाल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version