ढोल, नगाड्याच्या तालावर नक्षलवादी थिरकले

ढोल, नगाड्याच्या तालावर नक्षलवादी थिरकले

गडचिरोली, ८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: घनदाट जंगलात ढोल, नगाड्याच्या तालावर नक्षलवादी थिरकतानाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला. यामुळे सुरक्षा यंत्रणेच्या भुवया उंचावल्या आहेत. पोलिसांनी मागील काही वर्षांपासून राबविलेल्या आक्रमक नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षल चळवळ खिळखिळी झाली आहे.कथित नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या हिंसक कारवाया कमी झाल्या असून ही चळवळ संपण्याच्या मार्गावर आहे.

नक्षल्यांच्या मोठ्या कॅडरच्या मिलिंद तेलतुंमडे सारख्या अनेक नेत्यांसोबात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत जवळपास चाळीस ते पन्नास नक्षल्याना ठार करण्यात पोलिसांना यश आले होते. तर दुसरीकडे पोलिसांच्या आक्रमक कारवाईमुळे कित्येक नक्षल आत्मसमर्पण करून शासकीय योजनेचा लाभ घेत नक्षल चळवळीपासून मुक्त झाले. यात गडचिरोली पोलिसांनाही मोठे यश आले आहे. अशातच महिला आणि पुरुष नक्षलवादी ढोल, नगाड्याच्या तालावर नृत्य करीत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाली असून सदर चित्रफीत बस्तर भागातील असल्याचे बोलले जात असेल तरी व्हिडिओ व्हायरल झाल्याने आता सुरक्षा यंत्रणेच्या भुवया उंचावल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version